Wed, Apr 01, 2020 23:55होमपेज › Nashik › नाशिक : विद्यार्थ्याची आत्महत्या की घातपात?

नाशिक : विद्यार्थ्याची आत्महत्या की घातपात?

Published On: Dec 18 2017 3:17PM | Last Updated: Dec 18 2017 3:17PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

येथील आडगाव शिवारातील बळीरामनगर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.  राहत्या घरी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत  शुभम सुभाष पाटील (२०, रा. जळगाव) हा विद्यार्थी आढळला. सोमवारी (दि.१८) सकाळी ही घटना उघडकीस आली.

शुभमने आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी सापडल्याचे समजते. दरम्यान शुभमचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याने आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.