Wed, Jul 08, 2020 10:06होमपेज › Nashik › सेनेचे दिलीप दातीर यांचा मुंबईत मनसे प्रवेश

सेनेचे दिलीप दातीर यांचा मुंबईत मनसे प्रवेश

Published On: Oct 01 2019 2:02AM | Last Updated: Sep 30 2019 10:51PM
सिडको : प्रतिनिधी

मुंबई येथील मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणारे दिलीप दातीर यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यानंतर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीतील राजकारणाचे समीकरण बदलणार आहे.

दातीर यांनी मंदिरे वाचविण्यासाठी पाठपुरावा केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन अंबड लिंक रोड भागातील अनधिकृत भंगार मार्केट हटविले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित आघाडीसमोर दातीर यांनी आव्हान उभे केले आहे. प्रवेशसोहळा कार्यक्रमात  मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, नितीन सरदेसाई, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, माजी आमदार नितीन भोसले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, मनसेचे माजी गटनेते सलीम शेख, नगरसेवक योगेश शेवरे, निफाड तालुकाध्यक्ष प्रकाश गोसावी, नामदेव पाटील, सुरेश घुगे, बालेश जाधव, पराग शिंत्रे, सुरेश भंदुरे, किशोर जाचक, सचिन भोसले, नितीन साळवे, सत्यम खंडाळे, अंकुश पवार, सचिन सिन्हा, विजय आगळे, संदीप भवर, निखिल सरपोतदार, तुषार गांगुर्डे, श्याम गोहाड, अब्दुल शेख, सागर कोठावदे, संदेश जगताप, अतुल पाटील, निकितेश धाकराव, रोहित उगावकर, निवृत्ती गोवर्धने, पूनम कर्डेल, बबन जगताप, राहुल पाटील, गोपी पगार, संजय मटाले, शरद नवले, साहेबराव ढगे, निवृत्ती दातीर, शरद गायधनी, बाळासाहेब कोरडे, भाऊसाहेब गायकर, विनोद नवले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.