Sat, Jul 11, 2020 19:19होमपेज › Nashik › धुळे : कारच्‍या धडकेत युवकाचा मृत्यू 

धुळे : कारच्‍या धडकेत युवकाचा मृत्यू 

Published On: Jan 05 2019 5:19PM | Last Updated: Jan 05 2019 5:14PM
धुळे : प्रतिनिधी

धुळे शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावर कुंडाने फाट्यावर एका कारने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्‍थानी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मुंबई आग्रा महामार्गावर कुंडाने फाट्यावर नेहमी अपघाताच्या घटना घडतात. शनिवारी दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान पांढऱ्या रंगाच्या कार भरधाव वेगाने कुंडाने फाट्यावर आली. या गाडीने पायी जाणाऱ्या करण प्रवीण पाटील याला जोरदार धडक दिली. पुढे याच कारने मोटार सायकलला धडक दिली. यात अभिषेक ठाकरे हा युवक जखमी झाला आहे. 

अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघात झाल्यानंतर अभिषेख ठाकरे व करण पाटील या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र करण पाटील यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या अपघातामुळे कुंडाने व वरखेडे येथील नागरिक संतप्त झाले. त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन सुरू केले. तर दुसरीकडे शवविच्छेदन गृहाबाहेर मृतदेह घेण्यास नकार देत आंदोलन सुरू झाले. अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवत यांनी संतप्त जमवाबरोबर चर्चा सुरू केली. आरोपीला तातडीने अटक करण्याचे तोंडी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान या अपघाताची आझाद नगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.