Tue, Jun 02, 2020 13:57होमपेज › Nashik › तोतया ‘एसीबी’ अधिकार्‍यांना चोपले

तोतया ‘एसीबी’ अधिकार्‍यांना चोपले

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 11:07PMधुळे : प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करून साक्री तालुक्यातील भोनगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून खंडणी मागणार्‍या तिघांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला असून दोघांना साक्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

साक्री  तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार तसेच अन्य दुकानांकडून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून कागदपत्रांची तपासणी करण्याच्या बहाण्याने धमकी दिली जाण्याचे प्रकार वाढले होते. याविषयी पुरवठा विभाग अन्य विभागाकडे विचारणा केली जात होती. मात्र, संबंधीत पथक बाहेर जिल्ह्यातील असावे असा अंदाज लावण्यात येत होता. त्यातच शुक्रवारी भोनगाव येथील दिनेश बोरसे यांच्या स्वस्त धान्य दुकानासमोर एमएच 18 टी सी 90 या क्रमांकाची बोलेरो गाडी आली. या गाडीत तीन व्यक्ती बसलेले होते. यातील एक जण खाली उतरला. त्याने बोरसे यांच्याकडे रेशन दुकानाचे रजिस्टर व अन्य कागदपत्रांची मागणी करीत तक्रारी असल्याचे सांगितले.

यावेळी संबंधीत तोतया अधिकार्‍याने तडजोडीची भाषा सुरू केली. त्यामुळे बोरसे यांना संशय आला. त्यांनी साक्री येथील पुरवठा विभागात भ्रमणध्वनीवरून माहिती घेतली असता असे कोणतेही अधिकारी आणि गाडी आपल्या विभागाची नसल्याचे सांगितल्याने संबंधित अधिकारी हे तोतया असल्याचे स्पष्ट झाले.  त्यानंतर रेशन दुकानदार आणि काही तरूणांनी या तोतयांना चांगलाच चोप देऊन साक्री पोलिसांच्या ताब्यात दिले. आहे.