कळवण : प्रतिनिधी
नाशिकच्या कळवण तालुक्यातील गोसराने येथील महिला शेतकरी ललिता सिकंदर मोरे यांच्या शेतातील कोबी पिकावर अज्ञातांनी तणनाशक मारून एक एकर कोबी पिकाचे नुकसान केले. यामुळे मोरे यांचे लाखोचे नुकसान झाले.
ललिता मोरे यांनी आपल्या शेतात एक एकर कोबीचे पिक घेतले होते. सहा महिन्यापूर्वीच ललिता यांच्या पतीचे अकाली निधन झाले होते. यानंतर पतीच्या पश्चात कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्या परिस्थितीत संघर्ष करत त्यांनी आपल्या शेतात एक एकरवर कोबीचे पीक घेतले. या पिकासाठी त्यांनी बियाणे, निंदणी, फवारणी, अशा सुमारे ५० हजार हजारांवर खर्च केला. सद्यस्थितीला बाजारात कोबीला बऱ्यापैकी भाव असल्याने कोबी पिकातून अंदाजे दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, अज्ञात समाजकंटकांनी या पिकावर विषारी औषध फवारणी करून श्रीमती मोरे यांच्या लाखोचे नुकसान केले