Tue, May 26, 2020 12:37होमपेज › Nashik › जळगावात क्रिकेटवर बेटिंग, एकजण ताब्यात

जळगावात क्रिकेटवर बेटिंग, एकजण ताब्यात

Published On: Jan 08 2019 11:00PM | Last Updated: Jan 08 2019 11:00PM
जळगाव : पुढारी ऑनलाईन

शहरातील गोलाणी मार्केटमध्ये क्रिकेटवर बेंटींग केली जात असल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे. याप्रकरणी दोन ते दिवस पाळत ठेवून असलेल्या अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई करुन मोबाईल दुकानदारासह दुकानातील एका तरुणाला ताब्यात घेत आहे. उशीरापर्यत याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

गोलाणी मार्केटमध्ये सोना मोबाईल शॉपी या दुकानात मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट बेंटींग केली जात असल्याची गोपनीय माहिती अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला आदेश दिले होते. 

दोन दिवस पाळत ठेवून पथकाची कारवाई

पथकाने दोन दिवस संबंधित प्रकाराबाबत खात्री करण्यासाठी पाळत ठेवली. क्रिकेट बेटींग होत असल्याची खात्री झाल्यावर अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी स्वतः मोबाईल दुकानदारासह तरुणाला ताब्यात घेतले. दरम्यान, शहर पोलिस ठाण्यात आणत असताना संशयित मोबाईल दुकानदाराने गोंधळ घातला व बेटींग करत असलेले मोबाईल पोलिसांपासून लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याकडील दोन मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. 

सायबर क्राईमचा प्रकार असल्याने सायबर क्राईमच्या कर्मचार्‍यांनाही पाचारण करण्यात आले. गुन्हा दाखल नसल्याने नावे समजू शकले नाहीत. शहर पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. दरम्यान, याप्रकाराने मार्केटसह शहरात एकच खळबळ उडाली आहे. या क्रिकेट बेंटींगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.