Wed, Jul 08, 2020 18:35होमपेज › Nashik › पदवी परीक्षांना क्रेडिट गुणांकन

पदवी परीक्षांना क्रेडिट गुणांकन

Published On: Sep 30 2019 1:51AM | Last Updated: Sep 29 2019 11:41PM
नाशिक : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांच्या धर्तीवर पदवी शिक्षणक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षाच्या गुणांकन पद्धतीत बदल करण्याचा निणर्र्य घेतला आहे. विद्यापीठाने ‘चॉइस बेस क्रेडिट सिस्टिम’ (सीबीसीएस) गुणांकन पध्दती स्वीकारली आहे. त्यानुसार 80-20 या पारंपरिक परीक्षा पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. आता परीक्षा 70-30 या पद्धतीने होणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांचा कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक शाखेतील पदवी अभ्यासक्रमांकडे दिवसेंदिवस कल कमी होत चालला आहे. रोजगारांची संधी उपलब्ध करून देणार्‍या व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांसह पालकांकडून प्राधान्य दिले जात आहे. कला शाखेला तर विद्यार्थी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शाखा बंद करण्याची नामुष्की ओढवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करत चालू शैक्षणिक वर्षात क्रेडिट गुणांकन पद्धत लागू केली आहे. नवीन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना क्रेडिटच्या स्वरूपात गुण दिले जाणार आहे. 30 गुणांसाठी तोंडी परीक्षा (20 गुणांसाठी दोन प्रश्न), 5 गुणांसाठी तोंडी परीक्षा आणि 5 गुणांसाठी स्वाध्याय व प्रकल्प यासाठी असे 30 गुणांसाठी महाविद्यालयाच्या स्तरावर परीक्षा होईल. तर 70 गुणांची लेखी परीक्षा ही विद्यापीठस्तरावर घेण्यात येईल. प्रत्येक विषयात आवश्यक क्रेडिट गुण मिळाल्यास संबंधित विद्यार्थी हा त्या विषयात उत्तीर्ण समजला जाईल. सध्या 30 गुणांसाठी परीक्षा घेतल्या जात आहे. दिवाळीपूर्वी पहिल्या सत्रातील परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.