Wed, Jun 03, 2020 08:00होमपेज › Nashik › भालेकर मैदानावर गणेशोत्सवास मनपाचा नकार

भालेकर मैदानावर गणेशोत्सवास मनपाचा नकार

Published On: Aug 06 2019 1:48AM | Last Updated: Aug 06 2019 1:48AM
नाशिक : प्रतिनिधी

अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी सार्वजनिक मंडळाने सुरू केली आहे. मात्र, वाहनतळ तसेच मैदानाचा ताबा स्मार्टसिटी कंपनीकडे असल्याचे कारण देत महापालिकेने बी. डी. भालेकर मैदानावर गणेशोत्सवास परवानगी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आगामी काळात सार्वजनिक मंडळे आणि महापालिका यांच्यात तीव्र संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. 

शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालिमार येथील बी. डी. भालेकर मैदानावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या मैदानावर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, एचएएल, बॉश, महिंद्रा सोना, श्री राजे छत्रपती, श्री नरहरीचा राजा सामाजिक संस्था आदी मंडळांतर्फे गणेशोत्सवासाठी आरास उभारली जाते. शालिमार चौकालगतच मैदान असल्याने गणेशभक्तांची आरास बघण्यासाठी मोठी गर्दी होत असते.

यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बी. डी. भालेकर मैदानासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समितीने महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र, सध्या स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून भालेकर मैदानावर वाहनतळ उभारण्यात आले आहे.