Sat, Jan 23, 2021 06:51होमपेज › Nashik › ब्राह्मण समाजाचे मालेगाव येथे अधिवेशन

संस्कृत भाषा वाढीसाठी प्रयत्न करावेत : भारती  

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 11:36PM

बुकमार्क करा

मालेगाव : वार्ताहर

ब्राह्मणांनी स्वत्व जपावे, स्वार्थ जोपासू नये, ब्राह्मणांनी इंग्रजीपेक्षाही संस्कृत भाषा आत्मसात करावी. ही भाषा वाढीसाठी प्रयत्न करावे. ज्याप्रमाणे शरीर सुद‍ृढ राहण्यासाठी शरीरातील मेंदू हा सक्षम व निरोगी असायला हवा, त्याच प्रकारे सर्व समाजघटकांत ब्राह्मणांनी आपले आचरण ठेवायला हवे, असे मार्गदर्शन करताना करवीर पिठाचे शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंहजी भारती बोलत होते.

येथील ब्राह्मण सहायक संघाच्या वतीने दोनदिवसीय जिल्हास्तरीय बहुभाषिक सर्व शाखीय ब्राह्मण समाजाच्या अधिवेशनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मेधा कुलकर्णी, दिलीप बेलगावकर होते.

अखिल मानव सृष्टी ब्राह्मणांकडे गुरुतुल्य म्हणून बघत आहे. ब्राह्मणांचा गुरू हा अग्नी होय. त्यामुळे ब्राह्मणांनी अग्नीचे तत्त्व अवलंबावे. आपल्या वाट्याला जे जे येईल, ते आत्मसात करून पारंगत व्हावे. आपल्या वारसासाठी कमावण्याकरिता अतिरेक करू नये. धनसंचय ही वृत्ती ब्राह्मणांकरिता मारक असल्याचेही स्वामी विद्यानृसिंहजी म्हणाले. भानू कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शेखर कुलकर्णी यांनी परिचय करून दिला.

हरिप्रिया धर्माधिकारी व पोफळे यांनी स्वागतगीत सादर केले. जगदीश कुकडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राजेंद्र भोसले, नगरसेवक मदन गायकवाड, संजय काळे, गजू देवरे, भरत बागूल, भीमा भडांगे, भानुदास शौचे, मुकुंद कुलकर्णी, मकरंद सुखात्मे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार पाठक, शरद कुलकर्णी, विजय पैठणकर, सुभाष कुलकर्णी, पुरुषोत्तम जोशी, विजय पोफळे, विश्राम कुलकर्णी, डॉ. राजेंद्र करवा, अनिल कलंत्री, किशोर धर्माधिकारी, बापूसाहेब कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, नीलेश कुलकर्णी आदींसह युवा ब्रिगेडने प्रयत्न केले.