Tue, Nov 19, 2019 03:11होमपेज › Nashik › शालेय पोषण आहाराच्या तांदुळावर ठेकेदारांचा डल्ला

शालेय पोषण आहाराच्या तांदुळावर ठेकेदारांचा डल्ला

Published On: Jul 04 2019 11:05AM | Last Updated: Jul 04 2019 11:05AM
कळवण : प्रतिनिधी 

कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदळाच्या पोत्यात प्रमाणापेक्षा कमी धान्य असल्याचे दैनिक पुढारीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले  एका तांदळाच्या पोत्यात ३ किलो ५०० ग्राम तांदूळ कमी निघत असून इतर कडधान्य कमी निघत आहे. हिंगवे शाळेमध्ये हा प्रकार उघडीस आला आहे. येथील मुख्यध्यापकांनी पोह्चपावती कमी धान्याची नोंद केली आहे. असा प्रकार कळवण तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये सुरु असल्याची चर्चा आहे. 

३ जुलै २०१९ दुपारी १२ च्या सुमारे गाडी क्रमांक mh 15 ag 5507 या वाहनातून हिंगवे प्राथमिक शाळा येथे पोषण आहाराची गाडी तांदुळ उतरण्यासाठी आली. ठिकाणी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने तांदळाच्या पोत्याचे वजन करण्यासाठी सांगितले त्यावेळी ५० किलो पोत्यामध्ये फक्त  ४७ किलो वजन तर हरभरा डाळ, मुगडाळीमध्ये अल्प प्रमाणात धान्य कमी आल्यामुळे प्रकार उघडीस आला आहे.

वरिष्ठ पातळीवरून चौकशी केल्यास मोठा आहार घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे. वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे. विद्यार्थांच्या संख्येनुसार शाळांमध्ये २५० ते ४०० किलो पर्यत ५० किलोच्या पोत्यातून धान्याचा पुरवठा होतो संबंधित पोत्यामध्ये धान्य प्रमाणापेक्षा कमी निघाल्यामुळे गावातील नागरिकांनी ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुढारीच्या प्रतिनिधीने हिंगवे गावातील शाळांमध्ये मध्ये जाऊन तांदळाच्या पोत्यांच वजन करून पहिले असता प्रत्येक पोत्यात २ ते ३ किलो पर्यत तांदूळ कमी असल्याचे आढळून आले येथील मुख्यध्यापकास विचारणा केली तर प्रत्येक वेळी कमीच पुरवठा होतो. आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. कळवण तालुक्यातील २२५ प्राथमिक शाळांना शालेय पोषण आहार योजना अंतर्गत विद्यार्थाना आहारासाठी धान्य पोहच केले जातं. पहिली ते आठवी मध्ये एकूण २१५६१ मुले शिक्षण घेत आहे. या धान्यांमध्ये मोठी तफावत असल्याने मुलांना पूर्णतः अन्न मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.

हा प्रकार कळवण तालुक्यातील प्राथमिक शाळॆमध्ये उघड झाला आहे. तांदुळाच्या ५० किलो पोत्यामध्ये चक्क ३ ते ४ किलो तांदूळ कमी निघत असल्यामुळे मोठा धान्य आहार घोटाळा उघकीस आला आहे. या प्रकारमाची चौकशी अन्न पुरवठा मंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी जातीने लक्ष घालून करावी, अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.      

गेल्या काही दिवसांपूर्वी सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील जवळपास सहा कोटीचा रेशन धान्य घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यास जवाबदार असलेल्या अधिकारी, व अनेक दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले. कळवण हा सुद्धा आदिवासी बहुल तालुका असल्याने याच धर्तीवर आधारित कळवण तालुक्यातील शालेय पोषण आहार योजना अंतर्गत धान्य पुरवठा केला जातो. ५० किलो तांदुळाच्या पोत्यामध्ये फक्त ४७ किलो तांदूळ आढळून आला आहे. असा प्रकार अनेक दिवसापासून असा प्रकार सुरु आहे. त्यामुळे वजनांमध्ये मोठी तफावत आहे. याप्रकरणी वरिष्ठ पातळी वरून चौकशी करून दोषी आढळ्यास  ठेकेदारांचा ठेका रद्द करण्यात यावा दोषी अधिकारावर फौजदारी कारवाई करावी.

कैलास बागुल सरपंच हिंगवे 

जिल्हा परिषद शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदळाच्या पोत्यात चक्क २ ते ३ किलो कमी निघाल्याने हि गंभीर बाब आहे. हा प्रकार कधीचा सुरु असेल पंरतु आज माझ्यासमोर उघडकीस आल्यामुळे त्वरित चौकशी करून करावी करण्यात यावी.

शाळेतील मुख्याध्यापकडून धान्याचा अहवाल आल्यानंतर त्वरित वरिष्ठ पातळी वर पाठवून कारवाई करण्यात येईल यापूर्वी तांदूळ धान्य कमी प्रमाणात निघत असल्याची तोंडी तक्रारी आल्या आहेत.

जगदीश दंगव्हाळ या पुरवठादाराकडून कळवण तालुक्यात शालेय पोषण आहार पुरवठा केला जातो. शासनाचा हा तांदूळ चारवेळा उचलला जातो. त्याला हुक लागतात. त्यामुळे तांदूळ कमी होत असेल. साधारण या कालावधीत तांदूळ एक दीड किलो कमी होत असेल. तांदूळ कमी आला की मुख्याध्यापक कमी लिहून देतात. आज १४ वाहनातून  कळवण तालुक्याला पुरवठा केला आहे.

अनेक वर्षांपासून तांदुळाच्या पोत्या कमी प्रमाणात तांदूळ निघत आहे. काटा करण्यासाठी सांगतो पंरतु ठेकेदाराचे लोक मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत शाळेवर मुखाध्यापकांनी विरोध केला तर धान्य परत घेऊन जाण्याचा धमकी दिली धान्य कमी आल्यास पोह्चपावती नोंद केली जाते.