Wed, Jun 03, 2020 00:04होमपेज › Nashik › काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा धुळ्यातून उमेदवारी अर्ज दाखल 

काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा धुळ्यातून उमेदवारी अर्ज दाखल 

Published On: Apr 09 2019 2:00AM | Last Updated: Apr 08 2019 11:09PM
धुळे : प्रतिनिधी

धुळ्यात काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी शक्‍तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर वंचित आघाडीच्या वतीने कमाल हाशमी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

धुळ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसह वंचित आघाडीच्या उमेदवाराने आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांना सादर केले. काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी माजी खासदार चुडामण पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करून रॅली काढली. आग्रा रोडमार्गे ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून नेण्यात आली. यात काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आ. आसिफ शेख, आ सुधीर तांबे, मालेगावचे महापौर रशिद शेख, माजी आमदार अद्वय हिरे, नाशिकचे रवींद्र पगार, तुषार शेवाळे, श्याम सनेर आदी उपस्थित होते. आमदार कुणाल पाटील यांनी बैलगाडीत बसून मतदारांना आवाहन केले.