Wed, Aug 12, 2020 20:28होमपेज › Nashik › ६५ वाळू घाटांचे  जिल्ह्यात संयुक्‍त सर्वेक्षण

६५ वाळू घाटांचे  जिल्ह्यात संयुक्‍त सर्वेक्षण

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 26 2018 10:46PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील 65 वाळूघाटांचे संयुक्‍त सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाचे हे काम संबंधित तालुक्यांचे तहसीलदार व भूजल सर्वेक्षण विभाग करणार आहे. हे काम 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना गौणखनिज विभागाने यंत्रणांना दिले आहेत.

वाळूघाटांचे लिलाव हे साधारणतः पावसाळ्यानंतर केले जाते. दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर या काळासाठी घाटांचे वितरण होते. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच घाटांची प्रत्यक्ष पाहणी करत त्याचे अहवाल तयार करण्याचा निर्णय गौणखनिज विभागाने घेतला आहे. त्यानुसार तालुक्यांकडून घाटांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार सहा तालुक्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील 65 घाटांचे प्रस्ताव दिले आहेत. या घाटांची संयुक्‍त पाहणी करत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तहसील प्रशासन व भूजल सर्वेक्षणद्वारे होणार्‍या या सर्वेक्षणात घाटांची परिस्थिती, तेथे उपलब्ध वाळूचा साठा, सभोवतालची पर्यावरणीय स्थिती आदी बाजू तपासल्या जाणार आहेत. त्यानुसार अहवाल तयार करून तो अंतिम मान्यतेसाठी गौणखनिज विभागाकडे पाठविण्यात येईल. गेल्या तीन वर्षांचा इतिहास बघता जिल्ह्यातील घाटांच्या लिलावात प्रशासनाला सातत्याने अपयश आले आहे. जिल्ह्यातील घसरलेली वाळूची परिस्थिती आणि ई-ऑक्शनद्वारे बोलविले जाणारे लिलावामुळे घाट जात नसल्याची प्रमुख कारणे आहेत. गतवर्षी तर केवळ चार घाटांचे तिसर्‍यांदा लिलाव केल्यानंतर ते गेले होते. त्यातून प्रशासनाला केवळ 30 लाखांचा महसूल मिळाला होता. अनुभव गाठीशी असल्याने गौणखनिज विभागाने पुढील वर्षी लिलाव करायच्या घाटांची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे.