Thu, Jun 24, 2021 12:18होमपेज › Nashik › सिडको : दोन विदेशी क्‍वॉरंटाईन नागरिक पोलिसांच्या ताब्‍यात 

सिडको : दोन विदेशी क्‍वॉरंटाईन नागरिक पोलिसांच्या ताब्‍यात 

Last Updated: Mar 26 2020 3:08PM
सिडको : पुढारी वृत्तसेवा

सिडकोतील अश्विननगर येथील होम क्‍वॉरंटाईन असलेल्या दोन विदेशी नागरिकांना मनपा आरोग्य विभागाने पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. या व्यक्तींची रवानगी पंचवटी येथे उभारण्यात आलेल्या कोरोना क्‍वॉरंटाईन येथे करण्यात आली आहे. 

अंबड औद्योगिक वसाहतीत तैवान येथील कंपनीशी संलग्न कंपनी आहे. तैवानमधून दोन नागरिक अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आले होते. सदर कंपनी मालकाने या दोन व्यक्तींची राहण्याची व्यवस्था अश्विनी नगर येथील बंगल्यात  केली होती, सदर व्यक्ती या  चार - पाच दिवसांपासून येथे वास्तव्यास आलेले होते. त्यांची तपासणी केली असता, त्‍यांचा निगेटिव्ह अहवाल आला असून, त्यांना होम क्‍वॉरंटाईन ठेवले होते. 

परंतू, हे दोन्ही व्यक्‍ती परिसरातील नागरिकांना न जुमानता बाहेर फिरत होते. नागरिकांनी याची माहिती मनपा आरोग्य विभाग व पोलिसांना दिली. मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी व अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्वीन नगर येथे गेले, त्‍यांनी या दोन्ही विदेशी नागरीकांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पंचवटी तपोवनात उभारण्यात आलेल्या कोरोना क्‍वॉरंटाईन कक्षात केली आहे.