Tue, Jun 02, 2020 13:57होमपेज › Nashik › भुजबळांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादांना लिहिले पत्र

छगन भुळबळ म्हणतात, ‘माझ्या गावाचे रस्ते दुरूस्त करा’

Published On: Dec 31 2017 11:18AM | Last Updated: Dec 31 2017 11:18AM

बुकमार्क करा
लासलगाव : वार्ताहर

येथील रेल्वे गेट व शहरातील  मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले वळणरस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी येवला-लासलगाव मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

प्रकाशा-लासलगाव-विंचूर-भरवस फाटा  राज्य महामार्ग क्रमांक 7 वर लासलगाव रेल्वे उड्डाणपूल बांधणे, वळणरस्ता व उड्डाणपुलाचा जोडरस्ता या कामाला शासन निर्णय 14 फेब्रुवारी 2008, 31 ऑक्टोबर 2009 व   27 नोव्हेंबर 2012 अन्वये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. उड्डाणपूल, वळणरस्ता, उड्डाणपुलाचा पोहोच मार्ग व  उड्डाणपुलाचे बांधकाम रेल्वे विभागामार्फत पूर्ण झालेले आहे.

लासलगाव वळण रस्त्यासाठी व उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यासाठी एकूण 4.800 किमी लांबीकरिता दोन टप्प्यांत भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात  ज्यमार्ग क्रमांक 29 ते टाकळी विंचूर ते राज्यमार्ग क्रमांक 7 पर्यंतच्या (2.570 किमी) रस्त्याचा भूसंपादन प्रस्ताव तयार करण्यात आला. लासलगाव शिवारातील  जमिनीचा ताबा  (1.18 हेक्टर)  मिळाल्यामुळे नवीन रस्त्याचे 0.870 किमी लांबीचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

टाकळी विंचूर शिवारातील भूसंपादनासाठी वाढीव दराने  रक्‍कम  अदा करण्याकरिता एकूण 2681.58 लाख, तर रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी किमतीत 389.69 लाख सुधारित अंदाजपत्रकाप्रमाणे वाढ झालेली आहे. तसेच टप्पा- 2 मध्ये राज्यमार्ग 29 ते विंचूर  2.230 किमी)साठी 4.585 हेक्टर जमिनीचा भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आलेला आहे.