Tue, Aug 04, 2020 13:59होमपेज › Nashik › जळगाव जिल्ह्यात २१ हजार कोरोना संशयितांचे स्वॅब तपासले

जळगाव जिल्ह्यात २१ हजार कोरोना संशयितांचे स्वॅब तपासले

Last Updated: Jul 03 2020 7:19PM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी २ जुलैपर्यंत २० हजार ८७४ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १६ हजार ३५६ तपासणी अहवाल निगेटिव्ह तर ३ हजार ७९८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय इतर अहवालाची संख्या २६७ असून अद्याप ४५३ अहवालांची तपासणी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. 

अधिक वाचा : नंदुरबारमध्ये पुन्हा ५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

जिल्ह्यात सध्या ॲक्टीव्ह असलेल्या १२८२ कोरोना बाधित रुग्णांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे २०४, गोदावरी हॉस्पिटल येथे ६९, गणपती हॉस्पिटलमध्ये ३०, गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये ४५, उप जिल्हा रुग्णालय, चोपडा येथे २५ असे एकूण ३७३ तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ५९ रुग्ण व ८५० रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. 

यामध्ये जळगाव शहर ३२६, जळगाव ग्रामीण ५६, भुसावळ ८७, अमळनेर ७०, चोपडा ६९, पाचोरा ३१, भडगाव ७७, धरणगाव ५५, यावल ८३, एरंडोल ७९, जामनेर १०५, रावेर ९५, पारोळा ३३, चाळीसगाव १९, मुक्ताईनगर २६, बोदवड ६६, दुसऱ्या जिल्ह्यातील ५ असा रुग्णांचा समावेश आहे. 

अधिक वाचा : टिकटॉक बंदीनंतर 'तो' म्हणाला, 'माझ्या दोन्ही बायका लय रडल्या' 

कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून २२७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये जळगाव शहर ४२६, जळगाव ग्रामीण ६८, भुसावळ ३०२, अमळनेर २४३, चोपडा १७६, पाचोरा ५९, भडगाव १५३, धरणगाव १०४, यावल १२९, एरंडोल ९२, जामनेर ८७, रावेर १६६, पारोळा १९४, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर १९, बोदवड २०, दुसऱ्या जिल्ह्यातील  ५ रुग्णांचा समावेश आहे. 

कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३७९८ इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर ७९६, जळगाव ग्रामीण १३३, भुसावळ ४३५, अमळनेर ३४२, चोपडा २६३, पाचोरा ९७, भडगाव २३४, धरणगाव १७७, यावल २२८, एरंडोल १७७, जामनेर २०६, रावेर २८४, पारोळा २३०, चाळीसगाव ५०, मुक्ताईनगर ४८, बोदवड ८८, दुसऱ्या जिल्ह्यातील १० रुग्णांचा समावेश आहे. 

अधिक वाचा : नाशिक : खडकजांब येथील महिला शेती कार्यशाळेस कृषी सचिवांची भेट 

रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ७९९ ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व्हेक्षणासाठी जिल्ह्यात १९७५ टिम कार्यरत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ६१५, शहरी भागातील ८५४ तर जळगाव महापालिका क्षेत्रातील ५०६ टिम घरोघरी जाऊन तसेच नागरिकांची तपासणी करीत आहेत. या टिमच्या माध्यमातून जिल्हाभरात आतापर्यंत १ लाख ४६ हजार ३३५ घरांचे तर ६ लाख ६४ हजार ४७९ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यापैकी २ लाख ५ हजार ६९२ लोकसंख्या ग्रामीण भागातील तर उर्वरित लोकसंख्या नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका क्षेत्रातील आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत २४६ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी ८० टक्केपेक्षा अधिक रुग्ण हे ५० वर्षावरील तसेच त्यांना जुने आजार, विविध व्याधी असल्याचेही निदान झाले आहे. जिल्ह्यात सध्या संशयित रुग्ण शोध मोहीम सुरु असल्याने नागरिकांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी, लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे, अनावश्यक गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर राखावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.