होमपेज › Nashik › दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले  चौघा संशयितांना अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले  चौघा संशयितांना अटक

Published On: Jan 28 2019 12:53AM | Last Updated: Jan 28 2019 12:53AM
 

सिडको (नाशिक) : प्रतिनिधी

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या  टिप्पर गँगच्या चौघा संशयित युवकांना केवल पार्क, खान बंगला भाग, अंबड लिंक रोड परिसरात शुक्रवारी  मध्यरात्री   पकडयात अंबड पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडुन पोलिसांनी  गावठी कट्टा, मोटार सायकल व इतर साहित्‍य जप्त करण्यात आले. 

मिळालेल्‍या माहितीनुशार शुक्रवारी  मध्यरात्री  अडीच वाजण्‍याच्या सुमारास  केवल पार्क, खान बंगला भाग, अंबड लिंक रोड परिसरात म्हसोबा मंदिराच्या मागील झाडाखाली पाच ते सहा युवक संशयास्पद उभे असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली.  नियंत्रण कक्षाने अंबड पोलिसांना माहिती दिली. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  गुन्हे शाखेचे पथक त्वरीत  केवल पार्क भागातील खान बंगल्या जवळ पोहोचले.  

यावेळी त्यांना  काही संशयित युवक अंधारात उभे असतांना दिसले. पोलिसांची गाडी येताच त्यांनी पळ काढला. पण कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागे धावत त्यांच्या मुसक्या आवळल्या. यात संशयित मोबीन तन्वीर कादरी (वय २१, रा. उपेंद्रनगर), गौरव उमेश पाटील (वय १९, रा. माणीक नगर), चेतन भागचंद बाफना (वय २१, रा. श्रीराम नगर) व आकाश गणेश कुमावत (वय २१, रा. दत्त चौक) यांना ताब्यात घेतले. तर दोघा अनोळखी युवकांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. 

या चौघा संशयितांकडून गावठी कट्टा, तलवार, मिरची पुड व मोटार सायकल ताब्यात घेतली आहे. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक तुषार चव्हाण, पोलिस हवालदार  संजीव जाधव, कर्मचारी दत्तात्रय गवारे, नितिन फुलमाळी, हेमंत आहेर, संभाजी जाधव, चंद्रकांत गवळी, मनोहर कोळी, विनोद गौतम आदींनी ही कामगिरी पार पाडली. 

पोललिस हवालदार भास्कर मले यांच्या फिर्यादी वरून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. तसेच ते  टिप्पर गँग चे सदस्य असल्याचे प्राथमिक तपासात सिध्द झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.