Wed, Jun 03, 2020 08:38होमपेज › Nashik › पोलीस बंदोबस्तात भाविक फेरीस रवाना

पोलीस बंदोबस्तात भाविक फेरीस रवाना

Published On: Aug 19 2019 1:34AM | Last Updated: Aug 18 2019 11:39PM
नाशिक : प्रतिनिधी

तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी फेरीसाठी भाविक रविवारी (दि.18) सायंकाळनंतर त्र्यंबकेश्वरला बसने रवाना झाले. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले. त्यानुसार बसस्थानक, फेरी मार्ग, मंदिर परिसर आणि प्रवास मार्गात ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा तैनात होता. 

श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व असून, भाविक महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करीत असतात. त्यात सर्वाधिक गर्दी त्र्यंबकेश्वर येथे होत असते. त्याचप्रमाणे हजारो भाविक ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी जात असतात. ईदगाह मैदानावरून बसची व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन केले.