Sun, Jan 19, 2020 16:39होमपेज › Nashik › भुसावळ हत्याकांड;  तिघांना पोलीस कोठडी

भुसावळ हत्याकांड;  तिघांना पोलीस कोठडी

Last Updated: Oct 08 2019 11:26PM
जळगाव : प्रतिनिधी
भुसावळचे येथील नगरसेवक रवींद्र ऊर्फ हम्प्या खरात यांच्यासह कुटुंबातील चौघांच्या हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित शेखर ऊर्फ राजा हिरालाल मोघे, राजा बॉक्सर मोहसीन ऊर्फ अजगर खान व मयूर सुरवाडे यांना मंगळवारी कडक पोलीस बंदोबस्तात येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14  ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी न्यायालयाला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, हत्याकांडाला पूर्वीच्या वैमनस्याची किनार असल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संशयितांना सकाळी न्यायालयात हजर करण्यापूर्वी भुसावळ न्यायालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे यांच्यासह आरसीपी तुकडी, डीबी कर्मचार्‍यांसह होमगार्ड कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात केला होता.

दरम्यान, अटकेतील तीनही संशयितांनी सुरुवातीला लाल चर्चजवळ रोहित ऊर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर तसेच मित्र सुमित संजय गजरे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी चार फायर करण्यात आले. मात्र, एकही गोळी खरातसह गजरे यांना न लागल्याने आरोपींनी त्यांचा पाठलाग करीत त्यांच्यावर चॉपरने हल्ला चढवला. तर खरात भावंडांनीही आरोपींचा प्रतिकार केला व याचवेळी गजरे हादेखील धावून आल्याने त्याच्या मेंदूत गोळी शिरल्याने तो धारातीर्थी पडला. घटनास्थळावरून पोलिसांना चार झाडलेल्या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या तसेच तीन जिवंत काडतूस असलेले मॅगझीन सापडले आहे.

खरात यांंच्या मुलांना संपवल्याने हम्प्या आपल्याला जिवंत ठेवणार नाही ही खूणगाठ बांधूनच तिघांही आरोपींनी दुचाकीने समतानगर गाठले. याचवेळी नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया सुरू असताना ते बेसावध बसलेले असतानाच आरोपींनी त्यांच्यावर हल्ला अंदाधूंद गोळीबार केला यात त्यांच्यासह त्यांचे बंधूदेखील ठार झाले होते.  दरम्यान, हत्याकांडानंतर संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच19 एव्ही 9654) व मोबाइल तापी नदीपात्रात फेकले होते.