Tue, Jun 02, 2020 23:11होमपेज › Nashik › रस्त्यांबाबत शिवसैनिकांचा छगन भुजबळांना घेराव

रस्त्यांबाबत शिवसैनिकांचा छगन भुजबळांना घेराव

Published On: Jul 28 2019 1:36AM | Last Updated: Jul 27 2019 10:50PM
लासलगाव : वार्ताहर

कोटमगाव रोड व विंचूर-प्रकाशा महामार्गावरील सर्व्हिस रोड व इतर समस्यांबाबत येथील शिवसैनिकांनी आमदार छगन भुजबळ यांना घेराव घालून तक्रारींचा पाढा वाचला. ही कामे त्वरित न झाल्यास शिवसेना मोठे आंदोलन करता येईल, असा इशारा निफाड तालुका शिवसेनाप्रमुख प्रकाश पाटील यांनी यावेळी दिला.

लासलगाव-येवला मतदारसंघातील लासलगाव येथे कोटमगाव रोडवरील व विंचूर-प्रकाशा महामार्गावरील रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काँक्रिटीकरण केले असून, सदर काम पूर्ण होऊन सात ते आठ वर्षे झाले आहे. पण अजूनही विंचूर-प्रकाशा महामार्गावरील गटारीची कामे अपूर्ण आहेत. कोटमगाव रोडवरील रस्त्यांच्या साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. झालेल्या तसेच काँक्रीट रस्त्यांमुळे रस्ता साधारण एक फूट उंच झालेला आहे. एका बाजूचे गटारीचे काम पूर्ण झाले आहे पण ते काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तसेच डासांचे प्रादुर्भाव वाढले असून, ते नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. त्या गटारींवर ढापे टाकणे गरजेचे आहे. तेथे ढापे न टाकल्यामुळे व साईडपट्ट्या न भरल्यामुळे सदर ठिकाणी आतापर्यंत तीस ते पस्तीस छोटे-मोठे अपघात झाले आहेत. यात काही ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना व शाळकरी मुलांना दुखापत झालेली आहे. त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याला गावातील नागरिकांनी तक्रार केल्या असता कुठलेही पाऊल उचलले नाही. तसेच सदर साईडपट्ट्या भरण्याची सूचना अद्याप सदर ठेकेदारास दिलेली नाही.

या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर व इतर वाहनांची वाहतूक असल्याने या रस्त्यावर कायम वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन तेथे वाद होतात. त्यामुळे मार्केट गेट क्रमांक-1 ते माळी वस्तीपर्यंत भूमिगत गटार होऊन सर्व्हिस रोड नवीन बाजार समितीपर्यंत व्यवस्था करण्याची मागणी भुजबळ यांच्याकडे शिवसैनिकांनी केली.

यावेळी जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप, उपतालुका प्रमुख सोमनाथ गांगुर्डे, बाळासाहेब शिरसाठ, सुनील आब्बड, गणेश इंगळे, प्रमोद पाटील, संदीप उगले, अभिनव भंडारी, मयूर झांबरे, महेश बकरे, सुमंत कारवाळ, जितेंद्र फापाळे, बापू कुशारे, सुरज श्रीवास्तव, आप्पा साखरे, गिरीश साबद्रा, विक्रम शिंदे, नीलेश वडनेरे, अविनाश देसाई, संकेत वाळेकर आदी उपस्थित होते.