Wed, Jan 27, 2021 09:10होमपेज › Nashik › ‘भारत स्वाभिमान धर्मसंस्कार’ची सांगता

‘भारत स्वाभिमान धर्मसंस्कार’ची सांगता

Published On: Jul 31 2019 1:15AM | Last Updated: Jul 30 2019 10:55PM
जगन्‍नाथपुरी : रामनाथ शिंदे

जय बाबाजी भक्‍त परिवारातर्फे ओरिसातील जगन्‍नाथपुरी येथे आयोजित भारत स्वाभिमान धर्मसंस्कार सोहळ्याची उत्साहात सांगता झाली. पंधराशेवर महिला अन् पुरुष भक्‍तांच्या जपानुष्ठान सोहळ्याने जगन्‍नाथपुरी शहर भगवेमय झाले होते. जय बाबाजींच्या जयघोषाने सर्वत्र अभूतपूर्व उत्साह संचारला होता. 

संत जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी महामंडलेश्‍वर 1008 स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत ओरिसातील जगन्‍नाथपुरी येथे मेडिटेशन योगा, भारत स्वाभिमान धर्मसंस्कार समारोहांतर्गत अखंड नंदादीप जपानुष्ठान यज्ञ, महिला जप सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात तेराशेवर महिला व पुरुष भक्‍तांनी सहभाग नोंदविला. सोहळ्याच्या सांगतेप्रसंगी जगन्‍नाथपुरी शहरातून मंदिरापर्यंत संत जनार्दन स्वामी पादुका व प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. 

यजमान जोडप्यांच्या हस्ते यज्ञकुंडात यज्ञ करण्यात आला होता. त्याची पूर्णाहुती महामंडलेश्‍वर शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजनाने करण्यात आली. कलशपूजन, प्रतिमापूजन करून दानशूर भाविकांचा सन्मान महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वामी शांतीगिरी महाराजांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना जगन्‍नाथपुरी धामाच्या ठिकाणी जपानुष्ठान करून आपल्या परिवाराने इतिहास घडविला आहे. ईश्‍वरव्रत, मौनव्रताने अनुष्ठान झाले. 

भक्‍तांनी गुरूच्या प्रती पतिव्रतेप्रमाणे एकनिष्ठ भाव ठेवला पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी संताचे पूजन करण्यात आले. महाप्रसादाने  सप्ताहाची सांगता करण्यात आली.