Mon, Nov 18, 2019 09:14



होमपेज › Nashik › फसव्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून व्हा सावधान

फसव्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून व्हा सावधान

Published On: Nov 04 2018 1:17AM | Last Updated: Nov 03 2018 11:35PM



तन्मय दीक्षित 

इंटरनेटवरून अनोळखी नंबरद्वारे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वा टेक्स्ट मेसेज येऊ शकतात. पाठविणारी व्यक्‍ती जगाच्या पाठीवर कुठेही असू शकते व ती स्वतःची ओळख लपवून तुमची दिशाभूल करण्याचा, तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करू शकते. कारण अशा व्यक्‍तींना याचे खास प्रशिक्षणच दिले जाते. 

 ---- तुम्ही काय करायला हवे? ----

1)  तुम्हाला ज्या अ‍ॅप्लिकेशनवरून मेसेज आला आहे. उदा ः व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुक, त्या अ‍ॅप्लिकेशनला तुम्ही ‘रिपोर्ट अब्युज’ असे करू शकतात. म्हणजे त्या कंपन्यांना संबंधित व्यक्‍तीचा उद्देश                लक्षात येईल आणि ती त्या व्यक्‍तीवर कायदेशीर कारवाई करील.
2)  असे नंबर वा ई-मेल्सना तुम्ही तुमच्या सेटिंगमधून ब्लॉक सुरक्षित राहू शकता व सायबर क्राइमचे बळी होण्यापासून स्वतःला वाचवू शकतात. 
3)  असे मेसेज पाठविणार्‍या व्यक्‍तीवर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकतात. त्याच्यासाठी भारतामध्ये सायबर लॉसुद्धा आहे.
4)  तुमचा वन टाइम पासवर्ड, अकाउंटचा पासवर्ड, तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर अशी माहिती मिळवून फसवणूक केली जाते. अशी माहिती सहजासहजी कोणाला देऊ नये.
5)  अशा व्यक्‍ती तुमच्याशी संपर्क साधत असतील, तर त्यांच्याशी तुम्ही तुमच्या मातृभाषेत बोला. त्या व्यक्‍तीला तुमची भाषा येत  नसल्यास ती तुमच्याशी संवाद साधू शकणार नाही.
6)  तुमचा मोबाइल इतरांच्या हाती देऊ नये. कारण हॅकर एका मिनिटातसुद्धा मोबाइल हॅक करू शकतो. 
7)  मोबाइलमध्ये अँटीव्हायरस व फायरवॉल सतत सुरू ठेवा. स्कॅन करा व रेग्युलर अपडेट करीत राहा. 
8)  प्ले स्टोअरवरून अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करताना कोणकोणत्या परमिशन्स दिल्या आहेत, ते चेक करा व नको असलेल्या सर्व परमिशन्स काढून टाका.
9)  तुमच्या सर्व अकाउंटना सेकंड शिप ऑफ व्हेरिफिकेशन, टोकन सिक्युरिटी वापरा आणि अकाउंटला काही प्रॉब्लेम आल्यास बॅकअप बटण दाबून अकाउंट पुन्हा सुरू करा.
10) काम झाल्यावर वाय-फाय, ब्लू टूथ, एनएफसी बंद करा.