Fri, Jun 05, 2020 18:42



होमपेज › Nashik › जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणार नाही : मुनगंटीवार

'जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणार नाही'

Published On: Sep 19 2019 12:59PM | Last Updated: Sep 19 2019 1:01PM

संग्रहीत छायाचित्र



नाशिक : प्रतिनिधी

विधानसभेच्या तोंडावर अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ सोडत कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे पण जुन्या कार्यकर्त्यांचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यासंदर्भात अनेक उलटसुलट चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेला पुर्णविराम देत जुन्या कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे. 

नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात मुनगंटीवार बोलत असताना म्हणाले, की भाजपात मेगा भरती होत असली तरीही जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाणार नाही याची निश्चित काळजी घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. जुन्या कार्यकर्त्यांना डावलले तर पक्षाला नुकसान होऊ शकेल. त्यामुळे त्यांची निश्चितच योग्य काळजी घेतली जाईल.

तसेच युतीसंदर्भात म्हणाले, शिवसेना -भाजप आरपीआय यांची महायुती होईलच, मित्रपक्ष एकत्र बसून यावर चर्चा होऊ शकेल. प्रेमात, युद्धात आणि महायुतीत सारे काही क्षम्य आहे. असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.