Wed, Jun 03, 2020 21:40होमपेज › Nashik › जळगाव : शिक्षिकेवर चाकूने हल्ला करत शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिक्षिकेवर चाकूने हल्ला, शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jun 19 2019 3:01PM | Last Updated: Jun 19 2019 3:01PM
जळगाव : प्रतिनिधी

बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) मध्ये शिक्षकानेच शिक्षिकेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. के.ई. पाटील असे या हल्ला केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यानंतर या शिक्षकाने स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघेही शिक्षक जखमी झाले आहेत. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तालुक्यातील नाडगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहे. के.ई. पाटील हे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पाटील यांनी आपल्याच सहकारी असलेल्या एका शिक्षिकेवर अचानक चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाटील यांनी स्वत:च्या पोटात चाकू मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही शिक्षक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यातील जखमी शिक्षक व शिक्षिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.