नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर हल्ला झाला. ही घटना कुशावर्त चौक येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप अडसरे यास ताब्यात घेतलं आहे.
त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर कुशावर्त चौक येथे आले होते. तेव्हा त्यांच्यावर प्रदीप अडसरे या युवकाने हल्ला करून त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्यात त्यांच्या गळ्याला खरचटले आहे. हे वृत्त समजताच शहरातील सर्व भाजप कार्यकर्त्यांसह जमाव पोलीस ठाण्यात जमला आहे. मारहाण करणाऱ्या प्रदीप अडसरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकामध्ये सुरु आहे.