Tue, Nov 19, 2019 15:14होमपेज › Nashik › लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

Published On: Nov 25 2018 7:58PM | Last Updated: Nov 25 2018 8:00PMनाशिक रोड : वार्ताहर  

एका अल्पवयीन शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुलेनगर, मालधक्का रोड येथील एका युवकाने वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, याबाबत पीडित मुलीने उपनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

सचिन बाबुराव पगारे (२२) असे संशीयीत युवकाचे नाव असून, त्याने पीडित मुलीला वेळोवेळी भेटून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. चार महिन्यापूर्वी संशयीत सचिन पगारे याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला असल्याचे मुलीने सांगितले आहे. पीडित मुलगी गरोदर असून हा प्रकार तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत अत्याचार करणाऱ्या युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.