होमपेज › Nashik › जळगाव : पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार 

जळगाव : पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार 

Published On: Oct 18 2018 3:41PM | Last Updated: Oct 18 2018 3:39PMजळगाव :पुढारी ऑनलाईन

जळगाव शहरातील कॉलेज परिसरात एका पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकिस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जाणता राजा स्कूल जवळ झोपडपट्टीत झाली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

शहरातील कॉलेज परिसरात जाणता राजा स्कूल जवळ असलेल्या झोपडपट्टी एक मजूर कुटुंब राहत असून माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या घराचे बांधकामावर हे  कुटुंब मजूर म्हणून काम करत होते. त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे संपूर्ण कुटुंबाने आपली रोजची कामे करून दिनांक १७ चा रात्री झोपले होते. त्यारात्री साडेतीन वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या वडील व काकांना जोर जोराने ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी आपल्या झोपडीतून बाहेर येउन पाहीले असता त्यांची पाच वर्षांची चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. मुलीची अशी अवस्था पाहून वडील व काकांनी संपूर्ण परिसर पिजून काढला, मात्र त्यांना त्या परिसरात कोणीच मिळून आले नाही. त्यांनी, याची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले.

या प्रकरणात पीडित आई व वडील याचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. जर घर आतून बंद होते तर ही  ५ वर्षाची लहान मुलगी बाहेर कशी गेली हा सर्वात मोठा प्रश्न आहे . याप्रकरणी पोलिसांनी समतानगर मधील एका संशयीताला ताब्यात घेतले आहे.