Mon, Jun 01, 2020 07:07होमपेज › Nashik › माजी खासदार समीर भुजबळ यांच्याविरोधात ठकबाजीचा गुन्हा

माजी खासदार समीर भुजबळ यांच्याविरोधात ठकबाजीचा गुन्हा

Published On: Aug 03 2019 2:38PM | Last Updated: Aug 03 2019 2:38PM

आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड कंपनीचे संग्रहीत छायाचित्रमालेगाव : पुढारी ऑनलाईन

गिसाका येथील आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड कंपनीला लाभ पोहोचविण्यासाठी सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी दाभाडीचा तलाठी व कंपनीचे संचालक माजी खासदार समीर मगन भुजबळ यांच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे.

शिवाजी सिताराम पाटील (४८) या शेतकर्‍याने फिर्याद दिली आहे. दाभाडी शिवारातील गट नंबर १२०/७९९ ही शेतजमिन पाटील यांची आई निंबाबाई सिताराम पाटील यांची वडिलोपार्जित शेती आहे. या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर इतर अधिकारात त्यांचे नाव समाविष्ट आहे. 

दरम्यान, दाभाडीचे तलाठी पी. पी. मोरे यांनी आर्मस्ट्राँग कंपनीच्या हितासाठी शेत गट नंबर १२०/७९९ च्या सातबारा उतार्‍यावर जुलै २०१४ मध्ये एकाच महिन्यात पडित व पीकपेरा असा वेगवेगळा शेरा मारुन तो अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. तलाठ्याने आर्थिक फायद्यासाठी अधिकाराचा गैरवापर करुन सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. 

या प्रकरणी महसूल विभागाने केलेल्या चौकषीत तलाठी मोरेंवर दोषारोप सिद्ध झाले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर सीआरपीसी १५६ (३) अन्वये छावणी पोलिस ठाण्यात तलाठी मोरे व कंपनीचे संचालक समीर भुजबळ यांच्याविरोधात ठकबाजीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे हे करित आहेत.