Sat, Jan 25, 2020 22:27
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाशिक : विंचूरीदळवी शिवारात तीन दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद

नाशिक : विंचूरीदळवी शिवारात बिबट्या जेरबंद

Last Updated: Jan 15 2020 1:38PM

वनविभागाने लावलेल्या पिंजराविंचुरीदळवी (नाशिक) :  वार्ताहर

सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी शिवारात तीन दिवसांत दुसरा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

अधिक वाचा : उद्यानांमधील सीसीटीव्ही हटवा!

या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली होती. त्याच शेतात दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. विंचुरीदळवी येथील रमेश एकनाथ कानडे यांच्या गट नं. ६२८ येथे ऊसाची शेती आहे. त्या शेतात मागील दोन ते तीन दिवस अगोदर त्याच ठिकाणी बिबट्या जेरबंद केला होता. कानडे यांच्या शेतात आज (दि. १५ जानेवारी रोजी) सकाळी ५.३० च्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात आले. त्याच ठिकाणी दुसरा बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. या भागात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र येथे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी अद्यापही पोहचलेले नाहीत.

अधिक वाचा : सिन्नरजवळील अपघातात मुख्यमंत्र्यांची मेहुणी जखमी, एकाचा जागीच मृत्यू