नाशिकमध्ये ज्वेलरी दुकान फोडण्याचा प्रयत्न 

Last Updated: Aug 13 2020 2:09PM
Responsive image


नाशिक : पुढारी वुत्तसेवा

नाशिकच्या जेलरोड येथील त्रिवेणी पार्कमधील इंद्रप्रस्थ कॉलनीमधील एक ज्वेलरी दुकान फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. ही घटना गुरुवारी (दि.१३) पहाटे ४ च्या सुमारास घडली. यावेळी दुकानाचे शटर न तोडता आल्याने चोरट्यांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागले.

अधिक वाचा : जळगाव : दोन तरुणांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जेलरोड येथील त्रिवेणी पार्कमधील इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये असलेले तेजस्वी ज्वेलर्स या दुकानाचे ग्रील तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. कारमधून आलेल्या चोरट्यांनी अगोदर दुकानाबाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरा व ग्रील तोडले. पण, दुकानाचे शटर तोडता न आल्याने चोरट्यांना रिकाम्या हातानेच परत जावे लागले. या अगोदर  त्रिवेणी पार्क येथे काही दिवसांपूर्वीच डॉक्टर बोरकर यांच्या नर्सिंग होममध्ये चोरट्यांनी ७ लाख रुपये चोरून नेले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

अधिक वाचा : नाशिक जिल्ह्यात 16 मृत्यू

घटनास्थळी नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव, पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बीजली, पोलिस निरीक्षक गणेश नहायदे व कर्मचारी पाहणी केली असून याबाबत चोरांचा शोध पोलिस घेत आहे.

अधिक वाचा : 708 कोरोना योद्ध्यांची महापालिकेमध्ये नेमणूक