Wed, Jun 03, 2020 09:06होमपेज › Nashik › अवैध गर्भपात करून अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न

अवैध गर्भपात करून अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न

Published On: Jan 21 2019 5:33PM | Last Updated: Jan 21 2019 5:10PM
मालेगाव (नाशिक) : प्रतिनिधी

शहरात अवैध गर्भपात टोळी सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये एका तरूणीचाही सहभाग आहे. मात्र ही तरूणी फरार आहे. 

मालेगावात अवैध गर्भपात करणारी टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. या टोळीतील संशयिताकडून संशयास्पदरित्या खड्डे खणून काही तरी पुरण्याचे नागरिकांच्या निर्दशनास आले. यावेळी नागरिकांनी या संशयिताना तेथून हाकलून लावले. मात्र, या संशयितांनी या खड्ड्यात काहीतरी पुरले. ते अर्भक असू शकते असा स्थानिकांचा अंदाज आहे. 

याप्रकरणी किल्ला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र यात सहभागी असणारी तरुणी फरार झाली आहे. मनमाड रस्त्यावरील एका मळ्यात अवैध गर्भपात उरकण्यात आल्याची चर्चा आहे. घटनास्थळी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. खड्डे उकरल्यानंतरच यासंबंधी खरी माहिती समोर येणार आहे.