Fri, Jun 05, 2020 17:39
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › सावेडी कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन (video)

सावेडी कचरा डेपो हटविण्यासाठी राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन (video)

Published On: Jun 10 2019 2:21PM | Last Updated: Jun 10 2019 6:11PM
अहमदनगर  : प्रतिनिधी

सावेडी कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व नागरिकांनी महापालिकेत आंदोलन सुरू केले आहे.

सावेडी येथील कचरा डेपोस सोमवारी (दि.३) आग लागली होती. त्यावेळी शहरातील अनेक लोकप्रतिनिधीनी सावेडी येथील कचरा डेपोस भेट दिली होती. सावेडीतील कचरा डेपो तातडीने हलवावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन कारण्याचा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिला आहे.

तसेच बुरुडगाव येथील जागेवर कचरा प्रकल्प चालविता येणार आहे. शासनाने डिपीआर मंजूर केला असून टेंडर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आयुक्त श्रीकृष्ण भलसिंग यांनी दिली.  तरीही लेखी आश्वासन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे.