Thu, Jan 28, 2021 08:44होमपेज › Nashik › पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेला धक्का 

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेला धक्का 

Published On: Jul 05 2018 2:00AM | Last Updated: Jul 05 2018 2:00AMजळगाव (जि. नाशिक) : प्रतिनिधी

पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उद्धव मराठेसह संचालक वसंत झिपरू वाघ यांना जिल्हा उपनिंबंधक विशाल जाधववार यांना अपात्र घोषीत केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे बाजार समितीचे सत्तासुत्र  शिवसेनेकडून भाजपकडे जाणार आहेत.

सप्टेबर २०१५ मध्ये  झालेल्या बाजार समितीच्या पांचवार्षिक निवडणुकीत सभापती उध्धव मराठे व संचालक वसंत झिपरू वाघ हे ज्या संस्थेतून संचालक म्हणून निवडून आले व सध्या त्या संस्थेत संचालक नसल्याने महाराष्ट्र राज्य कृषी खरेदी, विक्री ( विकास व नियमन ) नियम १९६३ चे कलम १५ (१) नुसार उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव विशाल जाधववार यांनी अपात्र ठरविले. या प्रकरणी तक्रारदार संचालक सतिष शिंदे व अॅड. विश्वासराव भोसले यांचे तर्फे अॅड. विशाल सोनवणे यांनी उपनिंबंधकाकडे बाजू मांडली. या निर्णयानंतर पाचोरा बाजार समितीत शिवसेनेचे दहा पैकी पाच तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मिळून आठ संचालक असल्याने सभापतीपदासाठी भाजपच्या सतिष शिंदे यांचा मार्ग सुखकर झाला आहे. या पूर्वी याच कारणामुळे सेनेचे पाच संचालक अपात्र झाले होते मात्र दोन संचालकांना पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या आदेशाने  संचालक प्रताप हरी पाटील व पंढरीनाथ गोविंदा पाटील यांचे संचालकपद अबादीत राहीले. सध्यास्थितीत बाजार समितीत सेनेचे पाच तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ संचालक आहेत.

पाचोरा येथील बाजार समितीमध्ये संचालकांच्या १८ जागां असून शिवसेनेचे  १० तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे  ८ संचालक निवडून आले होते. चेअरमन, व्हाइस चेअरमन निवडणुकी दरम्यान सेनेचे मंगेश पाटील यांना दहा तर भाजपचे सतीश शिंदे यांना आठ मते मिळाली होती मात्र व्हा. चेअरमन पदासाठी सेनेच्या विश्वास पाटील यांना व भाजपाच्या अॅड. विस्वासराव भोसले यांना ९/९ असे सारखे मतदान झाले होते. त्यावेळी ईश्वर चिठ्ठीने विश्र्वास पाटील यांची निवड झाली होती. 

दरम्यान सेनेचे मंगेश पाटील, प्रताप हरी पाटील, पंढरीनाथ गोविंदा पाटील, विश्र्वास पाटील व विकास पंडीतराव पाटील, बाजार समितीत ज्या संस्थागटातून  (विकास सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघ) संचालक म्हणून निवडून आले सध्या त्या संस्थेत संचालक नसल्याने सहाकारी संस्था अघिनियम कलम १९६३ चे  १५ (१) व ४१ (१) नुसार अपात्र ठरविण्यात आले होते, मात्र यावेळी संचालक पंढरीनाथ गोविंदा पाटील व प्रताप हरी पाटील यांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचेकडे अपील केल्याने त्यांना क्लिनचीट मिळाली होती. दरम्यान सेनेचे उपसभापती संजय शिसोदिया यांनी राजीनामा दिल्याने व दहा पैकी तीन संचालक अपात्र झाल्याने शिवसेना अल्पमतात येवून उपसभापती म्हणून भाजपचे अॅड. विश्वासराव भोसले यांची वर्णी लागली होती. आज आलेल्‍या अपात्रतेच्या निर्णयाबाबत शाश्वती असल्याने भाजपचे  सतिष शिंदे व उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले यांनी पुढेही संघर्ष सुरूच ठेवला होता. त्यानुसार  तालुक्याच्या राजकारणातील उलटफेर होणारा आजचा मोठा निर्णय आला.