Wed, Jul 08, 2020 04:17होमपेज › Nashik › आदित्य ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

आदित्य ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

Published On: Dec 18 2017 2:05PM | Last Updated: Dec 18 2017 2:05PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  आजपासून दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित अनेक संघटनात्मक कार्यक्रम होणार असून त्यांच्या हस्ते नाशिक लोकसभा मतदार संघातील विविध विकासकांमाचे उदघाटन होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. आदित्य ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने शिवसैनिकामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते  १९ डिसेंबरला सकाळी इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो फाटा टाकेद यामार्गासाठी पन्नास कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे उदघाटन होणार आहे. सांयकाळी देवळाली कॅम्प येथील ऐतिहासिक बौध्द विहाराच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. दुसऱ्या दिवशी २० तारखेला ठाकरे यांच्या हस्ते सकाळी पोलिस मुख्यालयाजवळील मनपाच्या शाळा क्रंमाक १६ मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरुमचा शुभारंभ होणार आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे वरील विकासकामे मार्गी लागले असून विकास कामांच्या उदघाटनाप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे.