नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जन आशीर्वाद दौरा सुरू झाला असून, शनिवारी (दि.20) नाशिकसह त्र्यंबक, सिन्नर तसेच 21 जुलै रोजी निफाड आणि येवला तालुक्याची पाहणी करणार आहे. या दौर्यात ते नागरिकांशी संवाद साधणार असून, शेतकरी व कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत.
शनिवारी (दि.20) सकाळी 9.30 वाजता ते नाशिक येथून त्र्यंबकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता त्र्यंबक येथे स्वागत, त्र्यंबकेश्वराचे दर्शन, साधू-महंतांची भेट घेतील. दुपारी 12.30 वाजता त्र्यंबकला रेणुका हॉल येथे शेतकरी व कार्यकर्ता मेळावा होईल. त्यानंतर नाशिकला दुपारी 2.30 वाजता भोसला मिलिटरी स्कूल येथे भेट देतील. त्यानंतर देवळाली विधानसभा मतदारसंघातील सिन्नर फाटा येथे शेतकरी व कार्यकर्ता मेळावा, सिन्नरला सायंकाळी 5 वाजता नर्मदा हॉलमध्ये शेतकरी व कार्यकर्ता मेळावा होईल. 21 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजेला निफाडकडे प्रस्थान होईल, सकाळी 9.45 ला चेहेडी, चितेगाव फाटा येथे स्वागत, 10 वाजता चांदोरीतील मीरा मंगल कार्यालयात शेतकरी व कार्यकर्ता मेळावा, दुपारी 12 वाजता निफाड चौफुलीवर स्वागत, दुपारी 12.30 ला विंचूर चौफुलीवर स्वागत, त्यानंतर भरवस फाटा येथे स्वागत होऊन दुपारी 1 वाजता ते येवला येथील कला संस्कृती पैठणी कारखान्यास भेट देतील. त्यानंतर 1.30 वाजता आसरा लॉन्स येथे शेतकरी व कार्यकर्ता मेळावा होईल, अशी माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.