Wed, Sep 23, 2020 08:47होमपेज › Nashik › धुळ्यात कोरोना रुग्णसंख्या ५ हजारांच्या उंबरठ्यावर

धुळ्यात कोरोना रुग्णसंख्या ५ हजारांच्या उंबरठ्यावर

Last Updated: Aug 12 2020 12:09PM
धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास येते आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि. ११) एकाच दिवसात तब्बल २२९ बाधित आढळले आहेत. एकट्या धुळे महानगरात १०१ तर धुळे तालुक्यात ६९ बाधित आढळले आहे. जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा पाच हजाराच्या उंबरठयावर पोहोचला आहे. दरम्यान धुळे तालुक्यातील आणखी दोघा बाधितांचा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १४६ वर जाऊन पोहोचल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अधिक वाचा : चुकीची माहिती देणार्‍या पाचही खासगी लॅबना नाशिक मनपाची तंबी

धुळे जिल्ह्यात मृतांचा व बाधितांचा आकडा वेगाने वाढतो आहे. जिल्ह्यात सध्या सरासरी १०० रुग्ण दरदिवसाला आढळून येत आहेत. एकाच दिवसात तब्बल २२९ बाधित आढळले आहे. यात धुळे महानगरात सर्वाधिक १०१, तर धुळे तालुक्यात ६९, शिरपूरमधे दान व साक्रीत २६ तसेच शिंदखेड्यात ३१ बाधित आहेत. जिल्ह्यात सध्या बाधितांची संख्या ४६२२ वर गेली असून यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १२५५ इतकी आहे. सध्या एकटया धुळे महानगरात २३६२ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल शिरपूर तालुक्यात १०२३ तर धुळे तालुक्यात ४६३, शिंदखेडयात ४५७, व साक्रीमधे ३१७ बाधित सापडले आहेत. दरम्यान वैदयकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या आणखी दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात धुळे तालुक्यातील रानमळा येथील ५५ वर्षीय पुरुष व सोनगीर येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १४६ जणांचा कोरोनाने बळी गेला असून यात धुळे महानगरात ७४, धुळे तालुक्यात २०, शिरपूर तालुक्यात २९, शिंदखेडयात ११ व साक्रीमधे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

अधिक वाचा : नाशिकमध्ये 580 कोरोनामुक्‍त, तर 565 बाधित

 "