Wed, Sep 23, 2020 01:18होमपेज › Nashik › नंदुरबार : अवैध बायोडिझेल पंपांवर कारवाई

नंदुरबार : अवैध बायोडिझेल पंपांवर कारवाई

Last Updated: Aug 07 2020 3:09PM

संग्रहीत छायाचित्रनंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

नवापूर तालुक्यातील दोन अवैध बायोडिझेल पंपांवर कारवाई करत ते सील करण्यात आले असताना एका पंप चालकाने परस्पर पंप सुरू करण्याचा प्रताप समोर आला आहे. काल याची माहिती मिळताच तहसिलदार व नवापूरच्या पोलिस उपनिरीक्षकांनी तपासणी करत पंप सील केला. मालकाकडील दाखल्याची मागणी केली असून त्याची वैधता तपासणी करायची आहे. तर नाहरकत दाखला बनावट असल्यास संबंधीत पंपचालकावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असून बायो डिझेल पंपची वैधता चर्चेत आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील बायोडिझेल पंप चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी नसतानाही डिझेल विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवापूर तहसिलदारांनी तालुक्यातील कोठडा येथील दोन बायोडिझेल पंप अत्यावश्यक कागदपत्रे नसल्याने (दि. २६ रोजी) सील केले होते. कोठडा (ता. नवापूर) शिवारातील बायोडिझेल पंपावर नवापूर तहसिलदार व नवापूरच्या पोलिस उपनिरीक्षकांनी तपासणी केली होती. त्यावेळी संबंधीत पंप चालकाकडे पंप चालविण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने, ना हरकत दाखले मिळून आलेले नव्हते. तपासणीप्रसंगी पंपमालक उपस्थित असतानाही ते कागदपत्रे सादर करू शकले नव्हते. त्यामुळे त्या डिझेल पंपाला सील केले होते. मात्र दोनच दिवसांत (दि. २८ रोजी) सील उघडून पंपावर बायोडिझेलची विक्री पूर्ववत सुरु झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी यांचा ना हरकत दाखला दोनच दिवसांत कुठून आणला हा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला. नवापूर तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोठडा येथे पुन्हा भेट देवून तेथील कागदपत्रांची तपासणी केली असता पंपचालकाकडे आवश्यक ती कागदपत्रे मिळालीच नाही. त्यामुळे पंपचालकाने सादर केलेला ना हरकत दाखला हा खरा आहे की बनावट याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.

 "