Sun, Jan 19, 2020 16:32होमपेज › Nashik › निफाडच्या जवानाचा काश्मीरमध्ये मृत्यू

निफाडच्या जवानाचा काश्मीरमध्ये मृत्यू

Published On: Sep 28 2019 2:06PM | Last Updated: Sep 28 2019 1:05PM

सागर चौधरीनाशिक : प्रतिनिधी

निफाडचे जवान सागर माधव चौधरी (वय 32) हे काश्मीरमधील मांच्छिल सेक्टरमध्ये कर्तव्यावर असताना स्वत:च्या बंदुकीतील गोळी सुटल्याने अपघाती मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सागर चौधरी हे निफाड तालूक्यातील भरवस गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.

सागर हे शुक्रवारी (दि.27) सकाळी 7 वाजून 50 मिनिटांच्या आसपास मांच्छिल सेक्टरमध्ये कर्तव्यावर असताना त्यांच्या बंदुकीतील गोळी अचानक सुटल्याने ते जखमी झाले. यातच त्यांचा मृत्यू झाला. सागर हे 23 मार्च 2012 मध्ये लष्करात भरती झाले होते. विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर सध्या त्यांची नियुक्ती काश्मिरमधील माच्छिल सेक्टरमधील 56 आरआर बटालियनमध्ये होती. दरम्यान, सागर यांचे 27 एप्रिल 2016 ला लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात
पत्नी वर्षा, मुलगा शौर्य, आई-वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

सागर यांचे पार्थिव विमानाने आज (दि.28) सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर पोहोचण्याची शक्यता आहे. तेथून विशेष विमानाने हे पार्थिव ओझर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर मुळगावी भरवस येथे त्यांचे पार्थिव नेण्यात येईल. तसेच रविवारी लष्करी इतमातात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.