Mon, Jul 06, 2020 22:58होमपेज › Nashik › अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेजण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेजण ठार

Published On: Mar 31 2019 3:40PM | Last Updated: Mar 31 2019 3:54PM
जळगाव: पुढारी  ऑनलाईन

चाळीसगावहून मालेगावकडे  दोघेजण मोटरसायकलवरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चाळीसगाव तालुक्यातील देवळी-आडगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जागीच ठार झाले आहेत. 

ही घटना आज (दि. ३१) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. मयत झालेले दोघे हे हिरापूर रोड चाळीसगाव येथील रहिवाशी असुन वैभव देशमुख (गायकवाड) आणि अदित्य मधुकर वरसाळे अशी या दोघांची नावे आहेत. 

वैयक्तिक कामानिमीत्त हे दोघेजण चाळीसगावहून मोटारसायकलने मालेगाव येथे जात असतांना देवळी आडगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दोघे जागीत ठार झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव देशमुख आहे जिओ मोबाईल कंपनीत कामाला आहे तर अदित्य वरसाळे यांचे मोबाईल रिपेअरींगचे चाळीसगाव दुकान आहे.