होमपेज › Nashik › जळगाव : लाचखोर विद्युत सहाय्यक एसीबीच्या ताब्यात

जळगाव : लाचखोर विद्युत सहाय्यक एसीबीच्या ताब्यात

Published On: Jun 07 2019 11:00AM | Last Updated: Jun 07 2019 10:46AM
जळगाव : प्रतिनिधी

शेतात असलेल्या  चाऱ्याच्या गोडावुन वरून गेलेल्या विद्युत तारा  गोडावुनच्या बाजुने करून दिल्याच्या मोबादल्यात तक्रारदाराकडून विद्युत सहाय्यकाने दहा हजार रूपयांची लाच घेतांना एसीबीने रंगेहात पकडले आहे. 

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात असलेल्या गाईच्या चाऱ्याच्या गोडावनावरून  विद्युत तारा गेल्या होत्या. त्या तारा चाऱ्याच्या गोडावनाच्‍या बाजुने करून दिल्याबद्दल  तक्रारदार यांचेकडे १०  हजार रूपयांची लाचेची मागणी विद्युत सहाय्यक राहुल संतोष बेंडाळे (वय २४, रा. शिंदाड, ता.पाचोरा, रा-त्र्यंबक नगर )  यांनी केली. गुरूवारी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी राहुल बेंडाळे यांना तक्रारदाराकडून दहा हजार रूपये स्विकारतांना पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोलिस निरीक्षक गणेश कदम,  मनोज जोशी, प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांनी रंगेहात पकडले. रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे.