होमपेज › Nashik › जळगाव : दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे ठार

जळगाव : दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे ठार

Last Updated: Dec 16 2019 1:49PM

संग्रहित छायाचित्रजळगाव : प्रतिनिधी

भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोघाही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोणा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अल्लाउद्दीन मुबारक तडवी (फैजपूर) व पंखा पवार (हलखेडा, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या दिलेली माहिती अशी, पंखा पवार हे प्लॅटीना (एम.एच.१९ ई.ई.९७८७) वरून हितेश दारासिंग पवार (हलखेडा) यांच्यासोबत भरधाव वेगाने जात होते. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या विना क्रमांकाच्या हिरो होंडावरून अल्लाउद्दीन मुबारक तडवी (फैजपूर) व नबाब मुराद तडवी (फैजपूर) व शरीफ लतीफ तडवी (फैजपूर) हे ट्रीपल सीट जात होते. यादरम्यान दोन्ही भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्याने अलाउद्दीन तडवी व पंखा पवार यांच्या डोक्याला मार लागला. ते जागीच ठार झाले. 

अपघात प्रकरणी हिंगोणा पोलिस पाटील दिनेश बाविस्कर यांनी फैजपूर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दोघाही मयत दुचाकीस्वारांविरुद्ध मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक जिजाबराव पाटील करीत आहेत.