Tue, Jun 02, 2020 13:37होमपेज › Nashik › 'माझा बूथ सर्वात मजबूत' हा नारा पूर्ण करण्यासाठी काम करा : भुपेंद्र यादव 

'माझा बूथ सर्वात मजबूत' हा नारा पूर्ण करण्यासाठी काम करा : भुपेंद्र यादव 

Published On: Sep 24 2019 4:26PM | Last Updated: Sep 24 2019 4:26PM

या मेळाव्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन बोलत होतेधुळे : प्रतिनिधी  

भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे. त्यामुळे आता या परिवारातील सर्व बूथ प्रमुखांनी आपल्या भागातील बूथवर प्रभावी प्रचाराची यंत्रणा राबवून जनतेशी संपर्क ठेवण्याचे आवाहन राज्याचे भाजपाचे प्रभारी भुपेंद्र यादव यांनी केले. या विधानसभा निवडणुकीत युतीला २२० पेक्षा जास्त तर उत्तर महाराष्ट्रात ४२ प्लसचा नारा यावेळी देण्यात आला. तर नव्याने दाखल होणा-या केवळ १० टक्केच नेत्यांना उमेदवारी देणार असल्याचे यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले आहे.

धुळे येथे भाजपच्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे संघटना मंत्री विजयराव पुराणिक, बेटी बचाव अभियानाचे प्रमुख डॉ. राजेंद्र फडके, खासदार डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री आ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित, भारतीताई पवार, उदेसिंग पाडवी, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, स्मिताताई वाघ, उन्मेश पाटील, रक्षाताई खडसे, देवयानी फरांदे, लक्षमण सावजी, ॲड. किशोर काळकर, जिल्हाप्रमुख अनुप अग्रवाल, बबन चौधरी आणि हिरामण गवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री जयकुमार रावल यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यकत्यांना निवडणुकीच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन केले. 

ऐकेकाळी धुळे व नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण आता भाजपाच्या कार्यकत्यांनी परिश्रम करुन या उत्तर महाराष्ट्रातून सर्व आठ खासदार दिले. आता भाजपाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणाऱ्याची रांग लागली आहे. पण, भाजप योग्य उमेदवारांनाच संधी देणार असल्याचे रावल यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'माझा बुथ सर्वात मजबूत' हा नारा आता कार्यकत्यांनी प्रत्यक्षात पुर्ण करण्यासाठी काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

मंत्री गिरीष महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातून ४२ पेक्षा जास्त आमदार होतील असा दावा केला. या आकडेवारीवर पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादी ईव्हीएम मशीनचे रडगाणे गाणार आहेत. पण हा दावा आपण कार्यकत्यांच्या परिश्रमावर विश्वास असल्याने करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. राज्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत असल्याने जुन्या कार्यकत्यांचे काय होणार असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण निष्ठावान व जुन्या कार्यकत्यांना चिंता करण्याची गरज नाही. या निवडणुकीत पक्ष केवळ १० टक्केच नव्या प्रवेशितांना उमेदवारीची संधी देणार असून उर्वरीत सर्व जागांवर निष्ठावान व जुन्याच कार्यकत्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.