जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुने नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावाचा फैलाव होण्याबरोबरच आता कोरोना संसर्गामुळे मृत्यूही होत आहे. मध्यरात्री जुने नाशिकच्या पखालरोड परिसरातील एका ७३ वर्षीय वृध्दाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. जुन्या नाशकातील ही मृत्यूची पहिलीच घटना आहे.
काही दिवसांपूर्वी जुन्या नाशकातील कुंभारवाडा परिसरातील पहिली कोरोनाग्रस्त महिला आढळून आली होती. त्यानंतर लगेचच वडाळानाका परिसरातील मोठा राजवाडा येथे कोरोनाग्रसत रुग्ण आढळून आला.यासह जुने नाशिकच्या विविध भागात कोरोनाग्रस्त रूग्ण मिळून येण्याचा सिलसिला सुरु झाल्याने जुने नाशिककरीता धोक्याची घंटा वाजली होती. जुने नाशिक मधील कोरोनाग्रसत रूग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जुने नाशिकच्या पखालरोड येथील ७३ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा आज बुधवारी मध्यरात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७३ वर्षीय वृध्दाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूने नाशिक शहरातील मृत्यूचा आकडा आठवर पोहचला आहे, तर जुने नाशिकचा पहिला बळी ठरला आहे.