Fri, Dec 04, 2020 04:34होमपेज › Nashik › नंदुरबारमध्ये पुन्हा ५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

नंदुरबारमध्ये पुन्हा ५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

Last Updated: Jul 03 2020 6:24PM
नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

शहरासह जिल्ह्यातील ५ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर २४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथील ३ व्यक्ती संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

अधिक वाचा : टिकटॉक बंदीनंतर 'तो' म्हणाला, 'माझ्या दोन्ही बायका लय रडल्या' 

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनीतील ३६ वर्षीय पुरुष, नंदुरबार, पंचायत समिती येथील ३२ वर्षीय पुरुष,  मंगलदास पार्क, नवापूर मधील -६५ वर्षीय महिला, नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील ५० वर्षीय महिला, खोंडामळी (ता.नंदुरबार) येथील ५० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यापैकी ४ व्यक्तींवर पूर्वीच उपचार सुरू आहेत. तर २४ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती देण्यात आली.

अधिक वाचा : नाशिक : खडकजांब येथील महिला शेती कार्यशाळेस कृषी सचिवांची भेट