जिल्ह्यात सहा वर्षांत ४७० शेतकरी आत्महत्या

Last Updated: Oct 19 2019 1:27AM
Responsive image

Responsive image

नाशिक : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक प्रचारात वाढत्या शेतकरी आत्महत्या, कांदाप्रश्न, शेतमालाच्या घसरलेल्या दरांवरून वातावरण तापले असले तरी आजवर सर्वच राजकीय पक्षांच्या उदासीनतेमुळे शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच असून, गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यात 470 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

सध्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष शेतकर्‍यांप्रती कळवळा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि शेतमालाचे घसरलेले भाव अन् त्यात वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे नाशिकमध्ये 2014 ते आजतागायत याकाळात 470 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मालेगावसारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यात सहा वर्षांत सर्वाधिक 82 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्या खालोखाल महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असलेल्या निफाडमध्ये 81 आत्महत्या झाल्या आहेत. तर दुष्काळाच्या सतत छायेत असलेल्या बागलाण व नांदगावमध्ये अनुक्रमे 72 व 41 जणांनी मृत्यूला कवटाळले. त्याचवेळी आदिवासीबहुल तालुके असलेल्या पेठ, सुरगाणा व इगतपुरीतही कमी-अधिक प्रमाणात आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. विधानसभेच्या आखाड्यात यंदाही राजकीय पक्ष व उमेदवारांनी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध घोेषणा केल्या आहेत. मात्र, पुढील पाच वर्षांचा विचार केल्यास जिल्ह्यातून निवडून जाणारे लोकप्रतिनिधींनी कृषी प्रश्न खरोखरीच सोडविणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Farmers Protest Violence : हिंसाचारात १५० हून अधिक पोलिस जखमी, दोघांची प्रकृती गंभीर


'त्यांनी' तुझा आणि माझाही विश्वासघात केला; शीतल आमटेंच्या पतीची भावूक पोस्ट 


जळगाव : फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून गंडविणारा गजाआड


आंदोलकांचा दिल्ली पोलिसांना कोंडीत पकडत 'लाठीहल्ला' (Video)


पोलिसांच्या गोळीने नाही, तर ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; सीसीटीव्हीतून झाले स्पष्ट


उसाच्या फडाची आग विझवताना एकाचा मृत्यू


निपाणीत प्रजासत्ताकदिनी ११२ क्रमांकाच्या वाहनाचे लॉन्चिंग!


मोठी बातमी! शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेवर सर्व लोकल सुरू होणार


दिल्ली-लखनौतील सोने तस्करी प्रकरणातील ८ पैकी ४ जण सांगली जिल्ह्यातील


शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनात ८३ पोलिस जखमी; अतिरिक्त डीसीपींच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न