Fri, Jul 03, 2020 02:36होमपेज › Nashik › जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात ४५ रूग्ण 

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात ४५ रूग्ण 

Last Updated: May 29 2020 10:18PM

file photoजळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात ४५ रुग्ण सापडले आहे. रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील १९६ कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी १७२ अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर २४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये, सर्वाधिक जळगाव, पारोळा, भुसावळात रुग्ण आढळले आहे. यात जळगावातील आठ, भुसावळच्या चार, सावदा दोन, पारोळा येथील चार रूग्ण, चोपडा, चाळीसगाव, फैजपूर, धरणगाव, शिरपूर, बोरकूल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा समावेश आहे. 

खासगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या पाच व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये फैजपूर व भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा तर जळगाव शहरातील खोटे नगर, जुने जळगाव व मेहरूण रोड येथील तीन व्यक्तींचा समावेश आहे. तर दुसऱ्या अहवालात जिल्ह्यातील ११९ कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आले आहेत. पैकी ९८ अहवाल निगेटिव्ह तर २१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चाळीसगाव ३, चोपडा ५, धरणगाव २, वरणगाव ५, एरंडोल ३, भडगाव १, निंभोरा, रावेर येथील २ व्यक्तींचा समावेश आहे. 
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ६२१ इतकी झाली आहे.