Fri, Jul 10, 2020 02:18होमपेज › Nashik › मतदार पुनरीक्षणामध्ये राज्यात नाशिक दुसर्‍या स्थानी

जिल्ह्याची मतदारसंख्या ४३ लाखांवर

Published On: Jan 02 2018 1:12AM | Last Updated: Jan 01 2018 11:59PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

मतदारयाद्या पुनरीक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील बीएलओंनी चार लाख 90 हजार 575 घरांना प्रत्यक्ष भेटी देत नोंदणी केली. गृहभेटीत राज्यात बीडनंतर नाशिक दुसर्‍या स्थानी आहे. दरम्यान, जिल्ह्याची मतदारसंख्या 42 लाख 97 हजार 893 वर पोहोचली आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने 2019 मधील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर तयारीला सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गतवर्षी 5 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर आणि 16 ते 30 नोव्हेंबर याकाळात मतदार याद्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. जिल्ह्यात चार हजार 928 बीएलओंकडे 15 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार या कालावधीत बीएलओंनी 42 लाख 97 हजार 893 प्रत्यक्ष घरांना भेटी देत मतदारांची माहिती गोळा केली होती.  

जिल्ह्यात बीएलओंनी मतदार यादीचे कामास नकार दिला होता. मात्र, जिल्हा निवडणूक शाखेने प्रथमत: नोटिसा आणि नंतर थेट गुन्हे दाखल करण्याची तंबी दिल्याने बीएलओ कामाला लागले होते. दरम्यान, बीएलओंनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे राज्यात नाशिक दुसर्‍यास्थानी असून, नाशिकनंतर सोलापूरचा क्रमांक लागतो. बीएलओंनी जमा केलेली माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम निवडणूक शाखेतर्फे सुरू आहे.

दरम्यान, येत्या 10 तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादी पुनरीक्षणानंतर जिल्ह्यातील मतदार संख्या 42 लाखांच्यावर पोहचली आहे. दरम्यान, बीडमध्ये बीएलओंनी पाच लाख 49 हजार 237 घरांना भेटी देत पुनरीक्षण कार्यक्रमात आघाडी घेत राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे.