Tue, Aug 04, 2020 14:42



होमपेज › Nashik › नंदुरबार जिल्ह्यात आणखी ३ रुग्णांची वाढ

नंदुरबार जिल्ह्यात आणखी ३ रुग्णांची वाढ

Last Updated: Jul 14 2020 4:44PM

संग्रहित छायाचित्र



नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

नंदुरबार जिल्ह्यात आज (दि. १४) एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाने घेतलेल्या बळीची संख्या १३ वर पोहोचली आहे. तसेच आज सकाळी तीन जणांचे कोरोना चाचणी अहवल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्येत आणखी भर पडली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४५ जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. यातील २ हजार ५२ जणांचा अहवाल  निगेटिव्ह आला असून एकूण २७२ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून ८१ जणांवर  उपचार सुरू आहेत. जिल्ह्याबाहेरील पुणे, नाशिक आणि बडोदा येथे उपचार घेत असलेल्यांची संख्या १० आहे. उर्वरित १६८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परत गेले आहेत. तर जवळपास १५० जणांचा स्वॅबचा अहवाल येणे बाकी होता. 

दरम्यान, आज मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तीन रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच विसरवाडी (ता. नवापूर) ५२ वर्षीय महिला, जयंवत चौकातील ७१ वर्षीय पुरुष आणि भोईगल्ली (नंदुरबार) ५२ वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला आहे. 

वाचा  :औरंगाबादमध्ये नव्या ६८ रुग्णांची वाढ 

सोमवारी रात्री जिल्ह्यातील ९ रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात शहादा शहरातील दादावाडी कॉलनी ७० वर्षीय पुरुष, गरीब नवाझ कॉलनी ७० वर्षीय पुरुष, नंदुरबार शहरातील तलाठी कॉलनी ३७ वर्षीय महिला, गवळीवाडा ३९ वर्षीय महिला, रघुवंशी नगर २३ वर्षीय पुरुष, वर्धमान नगर ४२ वर्षीय पुरुष, विमल हौसिंग २७ वर्षीय पुरुष, भट गल्ली ४२ वर्षीय पुरुष, चौधरी गल्ली नंदुरबार २२ वर्षीय तरुण यांचा समावेश आहे. 

वाचा  :धुळे : शिरपूर तालुक्यात एकाचा कोरोनाने मृत्यू 

याशिवाय आतापर्यत १७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात खोंडामळी नंदुरबार १, पंचायत समिती नंदुरबार १, सरस्वती नगर नंदुरबार ३, मोलगी (ता. अक्कलकुवा) १, लोणखेडा (ता. शहादा) १, सदाशिव नगर शहादा १, कुकडेल मराठा गल्ली शहादा २, कल्पना नगर शहादा १, साईबाबा नगर शहादा-१, वृंदावन नगर शहादा १, गांधीनगर शहादा १, रेल्वे कॉलनी नंदुरबार १, गांधी नगर नंदुरबार १, मोहिदे (ता. शहादा) १ यांचा यात समावेश आहे.