Sun, Sep 27, 2020 03:44होमपेज › Nashik › जळगाव : २४ कोरोना बाधित रुग्णांची भर

जळगाव : २४ कोरोना बाधित रुग्णांची भर

Last Updated: May 29 2020 5:10PM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा  

चौथ्या टप्प्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज जिल्ह्यात २४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा ५९५ वर पोहोचला आहे.

रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील १९६ कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यांपैकी १७२ अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर २४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चोपडा, चाळीसगाव, फैजपूर, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा, जळगावातील आठ, भुसावळच्या चार, सावदा दोन, पावरा येथील चार रूग्णांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५९५ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 
 

 "