Sat, Jul 11, 2020 10:12होमपेज › Nashik › जिल्ह्यात २०९ नवे रुग्ण; ४ मृत्यू

जिल्ह्यात २०९ नवे रुग्ण; ४ मृत्यू

Last Updated: Jun 30 2020 11:04PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात मंगळवारी (दि.30) 209 कोरोनाबाधित आढळून आले. त्यात नाशिक शहरात 138 तर ग्रामीणमध्ये 71 बाधित आढळून आले. तसेच मंगळवारी 146 रुग्ण कोरोनामुक्त झाले. चौघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात दिवसभरात 138 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 178 इतकी झाली असून, त्यातील 931 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 105 जणांचा मृत्यू झाला असून, 1 हजार 105 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे मंगळवारी ग्रामीण भागातही 31 बाधित आढळून आले. त्यात सिन्नरमध्ये सर्वाधिक बाधित आहेत. ग्रामीणमध्ये आजपर्यंत एकूण 879 कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यातील 516 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 47 जणांचा मृत्यू झाला असून, 316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मंगळवारी सिन्नर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यात ठाणगाव येथील 72 वर्षीय वृद्ध, तर पांढुर्ली येथील 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मालेगाव येथे दिवसभरात एकही बाधित आढळून आला नाही. तर तेथे सापडलेल्या 1 हजार 31 रुग्णांपैकी 815 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 75 जणांचा मृत्यू झाला, तर 141 बाधितांवर उपचार सुरू आहेत. मालेगाव येथील 65 वर्षीय बाधिताचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्याबाहेरील 124 पैकी 78 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 35 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 13 तारखेनंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 4 हजार 252 इतकी झाली असून, त्यातील 2 हजार 340 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 238 जणांचा मृत्यू झाला. तसेच 1 हजार 597 बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात 309 संशयित दाखल : जिल्ह्यात दिवसभरात 309 संशयित दाखल करण्यात आले आहेत. त्यात नाशिक शहरात 199, मालेगावमध्ये 12 आणि ग्रामीणमध्ये 98 संशयित आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात 965 संशयितांचे अहवाल प्रलंबित होते.