Wed, Dec 02, 2020 08:52होमपेज › Nashik › जळगाव जिल्ह्यात तब्बल २०९ रुग्णांची भर

जळगाव जिल्ह्यात तब्बल २०९ रुग्णांची भर

Last Updated: Jul 03 2020 9:11PM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेले काही दिवस सलग रुग्णांची शंभरी गाठत असताना आज, शुक्रवारी (दि.३) थेट द्विशतकाचा आकडा पार केला. आज जिल्ह्यात नव्याने २०९ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाचा आकडा हा ४ हजार पार करत ४००७ इतकी रुग्ण संख्या झाली आहे. यात जळगाव शहरात ८५१ तर भुसावळ शहरात ४५३ रुग्णांची नोंद झाली आहे.  

अधिक वाचा : जळगाव जिल्ह्यात २१ हजार कोरोना संशयितांचे स्वॅब तपासले

आज मिळालेल्या अहवालनुसार जिल्ह्यात २०९ कोरोना बाधित सापडले. तर ६ रुग्णांचे मृत्यू झाले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा २०६ वर पोहचला आहे. आज जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, भडगाव, पारोळा, रावेर, यावल या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. यात चिंताजनक रुग्ण असलेल्या २०६ जणांवर उपचार सुरू आहेत. 

अधिक वाचा : जळगाव : दफनभूमीच्या वादातून ग्रामपंचायती समोरचं मृतदेहासह ठिय्या

जळगाव शहर ५५, जळगाव ग्रामीण १३, अमळनेर ८, भुसावळ १८, भडगाव १३, बोदवड १, चाळीसगाव ४, चोपडा ११, धरणगाव ६, एरंडोल २८, जामनेर ७, मुक्ताईनगर १, पाचोरा १, पारोळा २२, रावेर १०, यावल ११ असे २०९ रुग्ण सापडले आहे. 

अधिक वाचा : टिकटॉक बंदीनंतर 'तो' म्हणाला, 'माझ्या दोन्ही बायका लय रडल्या'